कर्वे रोडवर एक तरुण एका गृहस्थांना ओलांडून जोरात पुढे जातो. मात्र पुढे जाऊन त्याला सिग्नलमुळे थांबावेच लागते. ते गृहस्थही येऊन पोहोचतात.

गृहस्थ:   का हो? आपले नाव कर्वे आहे का?
तरुण:    नाही, का?
गृहस्थ:   म्हंटलं आपल्या बापाचा रस्ता असल्याच्या थाटात गाडी चालवत आहात. मला वाटलं हा तुमचा घरचा रस्ता असावा.