तुझं मोकळं मोकळं हसू
मलाही मोकळं करणार होतं
पण---
ओठांच्या कोपऱ्यात तुझ्या
मुरड दिसली किंचितशी
अन्
अवघडलेपणाची तेव्हाच

जाणीव झाली मला जराशी

तुझा हळुचसा आश्वासक स्पर्श
मला धीराचा ठरणार होता
पण--
सूक्ष्म कंप तुझ्या हातांचा
कसा न जाणो मला उमगला
अन्
माझाच धीर एकवटून
मीच तुझा तोल सावरला!

वा...वा...मुग्धा, छान. आवडले हे दोन्ही तुकडे.