स्त्रीमुक्तीविषयक परंपरागत लसेच बदलत्या कल्पनांचे सुंदर विश्लेषण या लेखात केले आहे. मला असे वाटते की मुक्ती हा कांहीसा प्रतिक्रियात्मक (रिऍक्शन) शब्द आहे. तिथे बंधन हे गृहीत धरलेले आहे. स्त्री असो वा पुरुष असो, त्याला कधीच अनिर्बंध जगता येत नाही. परिस्थितीने निर्माण केलेली कांही बंधने पाळावी लागतात, तर कांही तोडण्याचा प्रयत्न करता येतो. हा संघर्ष युगानुयुगे चाललेला आहे.
मुक्तीऐवजी 'प्रगती' ही सकारात्मक (प्रोऍक्टिव्ह) संकल्पना मनाशी धरली तर त्यातून अधिक समाधान प्राप्त होईल असे मला वाटते.