मी मुलुंड पुर्वदुतगती मार्गावर म्हाडा वसाहतीमध्ये राहतो. हि वाहन चालवण्याची गुर्मी म्हणा किंवा निष्काळजीपणा म्हणा आमच्या हायवेवर अजून पर्यंत ९ मोठे अपघात आणि आठवड्याला छोटे अपघात होत असतात. सिग्नल बदले पर्यंत या गाड्या रस्त्याच्या मध्ये पोहचलेल्या असतात. आणि हिरवा ते लाल दिव्याच्या मध्ये या रस्ताच्या पुढे पोहचलेल्या असतात ब्रिजवरून या गाड्या ७०-८० च्या वेगाने खाली उतरतात अजून हि हा रस्ता ओलांडताना भिती वाटते कधी कुठली गाडी वाहतुकीचे साधे नियम तोडेल आणि त्याची किंमत आपल्याला आयुष्यभर मोजावी लागेल.