छान...छान...

जीवनातली संपणार तडजोड कधी?
सापडेल का उपाय मज बिनतोड कधी?...

शब्द जिव्हारी तुझे लागती थट्टेचे
बदलणार का सांग तुझी ही खोड कधी?...

कशाकशाच्या मागे धावत असतो मी?
बदलणार ही वृत्तीची धरसोड कधी?...

पचवत आहे तुझे जीवना सत्य कटू
वाट पाहतो शेवट होइल गोड कधी?...

मस्त....

शुभेच्छा, अजब.