आम्हाला  शाळेत एक कविता होती--

कितीतरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो
कितीतरी दिवसांत नाही नदीत डुंबलो
शुभ्र चांदण्याची ओढ आहे जुनी ही तशीच
आणि वाहत्या पाण्याची शीळ ओळखीची तीच----

पूर्ण कविता इथे देत नाही (खरं म्हणजे आठवत नाहीये), पण मला त्या कवितेबरोबरचं चित्र आठवतंय. एका लहानग्या मुलाचं होतं.
तुझी कविता वाचून असं वाटतंय की तोच लहान मुलगा आता मोठा झाला आहे आणि ---कवितेचं एक सुरेख आवर्तन पूर्ण झालं आहे----!  कारण कवितेच्या समारोपाच्या ओळी अश्या होत्या--

केव्हातरी चांदण्यात पुन्हा जाईन निर्भय
आणि वाहत्या नदीत होईन मी जलमय---