मस्त झालाय बर का 'छा'!! फ़ारच सुरेख वर्णन.. छ्या!! चिनी छा साठी तरी चिनवारी करावीशी वाटतेय  

'उदर भरण नोहे' च्या चालीवर 'चहा ढोसणे नोहे' असे मनात आले... एकदम पूर्वरंग आठवले.. जेव्हा पु.ल. जपानी चहा एका टेकडिवर पितात तेव्हाची.. त्यांची वाक्यं नीटशी आथवत नाहित पण सारांश असा की "तास तास चहा पिण्याची नजाकत - संथपणा आहे तो पश्चिमेच्या पर्यटकांना काय कळणार.. "सुपरस्पीड" माग़े धावणाऱ्यांना सत्यनारायणावर एक एक करत वहायची तुळस, किंवा शिवलिंगावर थेंब थेंब होणारा अभिषेक याच महत्त्व कळेल का? ती घटके घटकेने फुलत जाणारी रात्र आम्हा अशियाई लोकांनाच ठाऊक.. "
आणखि एकदा "स्टिम बोट" ची पंगत हॉगकाँग ला भरली असताना या खास आशियाई तास तास चालणाऱ्या मैफिलीसम जेवणाची रंगत आठवली (हे ही पूर्वरंगच बहुतेक)