पंक्चरली जरी रात्र दिव्यांनी

तरी पंपितो कुणी काळोख

हसण्याचे जरि वेड लागले

भुंकतात तरि अश्रू चोख.

फतकन् बसली रबरी रात्र

दुजी न टायर ह्या अवकाशी

राठ मनांच्या चाटीत बसली

पापुद्रयांच्या कुत्री राशी

खांद्यावरुनी न्यावी रात्र

जमेल ज्याला त्याने त्याने

डोळ्यांवरती जरा कातडे

ओढावे पण ह्सतमुखाने

पंक्चरलेल्या रबरी रात्री

गुरगुरवावी रबरी कुत्री

--बा‌. सी. मर्ढेकर

(पाठभेद असल्यास चू. भू. द्या. घ्या.)