मनोगतवरील प्रतिसाद पाहून आनंद वाटला.
हे मासिक पुणे येथील आहे. नुकतेच ६०व्या वर्षात मासिकाने पदार्पण केले आहे. इतकी वर्षे एका संपादकत्वाखाली यशस्वीपणे सुरू असलेल्या या मासिकाने विश्वासार्हता संपादन केली आहे.
त्यातील साहित्य नेहमीच दर्जेदार असते. ६० वर्षे वयातही मासिकाने तरूण रहावे व तरूण पिढीशी संवाद साधावा या विचारानेच 'मनोगत'वरील लेखकांना आमंत्रित करीत आहे.
कृपया आपले 'नमुना साहित्य' खालील पत्त्यावर पाठवा. ई-मेल असल्याने साहित्य स्कॅन करून अथवा पी.डी.एफ. करून पाठवल्यास उत्तम. सोबत आपले नाव, पत्ता व फोन नंबर असल्यास वैयक्तिक पातळीवर संपर्क करणे सोयीचे होईल. editor.monthly@gmail.com
आपल्या प्रतिसादाची वाट पहात आहे.
पुनःश्च धन्यवाद !