सिंग्युलॅरिटीचा अर्थ एकमेवाद्वितीय असा होऊ शकत असला तरी मला कोणती छटा अपेक्षित आहे हे सांगते. कृष्णविवरांचे केंद्र वा महास्फोटापूर्वीचे बिंदुवत् विश्व ह्यासाठी सिंग्युलॅरिटी हा शब्द वापरावयाचा आहे. आता कृष्णविवरे अनेक आहेत, ती काही एकमेवावद्वितीय गोष्ट नाही. मात्र सर्व कृष्णविवरांच्या केंद्रापाशी बिंदुवत् वस्तुमान व अनंत घनता अशी जी अतिविशिष्ट परिस्थिती असले त्या परिस्थितीला उद्देशून सिंग्युलॅरिटी हा शब्द वापरायचा आहे. असामान्य, अतिविशिष्ट ही विशेषणे आहेत. हे शब्द वापरले तर त्यापुढे गोष्ट/घटना/परिस्थिती असे शब्द वापरणे भाग आहे. त्याऐवजी एखादे नाम असेल तर हवे आहे.