जिओडेसिक्स साठी कोणता मराठी शब्द आहे?

सपाट पृष्ठभागावरील सरळ रेषेचे वक्रपृष्ठावरील रेषेत रुपांतर केले तर जी वक्र रेषा मिळेल ती म्हणजे जिओडेसिक. हा शब्द जिओडेसी म्हणजे पृथ्वीचा आकार आणि मापन करणारे शास्त्र ह्यावरून आलेला आहे. पृथ्वीच्या वक्रपृष्ठावरील दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतराचा मार्ग म्हणजे जिओडेसिक. त्या बिंदूंमधून जाणारे आणि पृथ्वीचा केंद्र हेच केंद्र असलेले वर्तुळ काढल्यास त्या वर्तुळाचा त्या दोन बिंदूंदरम्यानचा भाग म्हणजे जिओडेसिक.

कोणाकडे भूगोलाचे मराठी पुस्तक असल्यास त्यात हा शब्द आहे का कृपया पाहावे.