तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

प्रियाली,विनम्र, प्रदीप, हर्षद,निनाद:

मला हे मान्य आहे कि, त्या मुलाची चूक होती. पण तो काही घोर अपराध नव्ह्ता. मुख्य म्हणजे, त्याला जेव्हा हे उमगले कि चूक झाली आहे तेव्हा त्याने लगेच क्षमा पण मागितली. बहुतेक जण अशावेळी उद्धटपणे उत्तर देऊन निघून जातात.  पण अनूपने आजोबांच्या वयाचा मान ठेवला. दुसरी गोष्ट म्हंजे, गाडी थोडिशी पुढे आलि होती ती काय पुर्णपणे  झेब्रा क्रॉसिंगवर नव्हती. बाय द वे, एखादा क्षमा मागत असेल तर त्याला माफ़ करण्यातच मनाचा मोठेपणा आहे (चूक लहानशी असेल तर.)

आजानुकर्ण:

अशानी आपण ३/४ लोकांना यमदसनी पाठवाल.  तुम्ही अस म्हणताय जसं काही अनूप हा कोणि अट्टल गुन्हेगारच आहे.  चूक आणि अपराध, तसेच त्याला मिळणारी शिक्षा ह्यात काहि ताळमेळ हवा. चित्रपट आणि प्रत्यक्ष आयुष्य हयात बरीच तफावत असते.

राजगुडे:

ह्यात माझा काहिही विनोद झालेला नाही.  मला वाटतं की तुमच्या मधला हास्य रस (नवरसांपैकी) संपला आहे.  आयुष्यामधे प्रत्येक गोष्ट गंभीरपणे पहायची नसते. 

केवाका:

आपण ह्या प्रसंगाला योग्य त्या स्पिरीटनि घेतल्याबद्दल धन्यवाद.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सर्वांचा दिवस चांगला जावो.