मी इकडे दिल्लीत राहते.रोज कार्यालयात जाण्यासाठी मला मेट्रो ट्रेन मधून जावे लागते.मेट्रो ट्रेनमध्ये प्रत्येक डब्यात २ सिटस ह्या म्हाताऱ्या आणि अपंग लोकान्साठी राखीव ठेवलेल्या आहेत. अशाच एका सीट्वर २ तरुण मुले बसली होती.पुढच्या स्टेशनवर एक आजोबा चढले आणि त्या मुलांच्या समोर जाऊन उभे राहिले.आजोबांनी त्या मुलांना खडसावले की ही जागा राखीव आहे. त्यातला एक मुलगा उभा राहिला.आजोबा बसले.मग आजोबांनी दुसऱ्या मुलाला फ़ैलावर घेतले की तुम्ही उठत नाही.मग तो बसलेला मुलगा त्याला म्हणाला की अहो आजोबा माझा भाऊ उठला ना मग झाले की आता.

तरी पण ते आजोबा त्यांचे स्टेशन येईपर्यंत बोलतच राहिले.