सौरभ,
वर्णन आणि छायाचित्रे अतिशय सुंदर आहेत.
लहानपणी आजोबांबरोबर कित्येकवेळा रेहेकुरीचे अभयारण्य पाहण्याचा योग आला. तेथून जाताना दरवेळेस गाडी थांबवून पळणाऱ्या हरणांचा आणि काळवीटांचा कळप पाहण्याचा आनंद लुटला आहे, पण आता हे प्राणी पूर्वीसारखे सहजासहजी दिसत नाहीत. त्यासाठी तुमच्यासारखे अभयारण्यातच जावे लागेल असे वाटते.
मागे एकदा वर्तमानपत्रात रेहेकुरी अभयारण्य हे माळढोक पक्षांसाठीही प्रसिद्ध असल्याचे वाचनात आले, पण तेथे प्रत्यक्ष माळढोक मला तरी अद्याप दिसला नाही.
श्रावणी