अभिनंदन अनिलराव. प्रत्येकानंच असं करायची गरज आहे.

असा एक प्रसंग माझ्या देखत घडला असता मी थोडी वेगळी प्रतिक्रिया दिली होती (विषय निघालाच आहे म्हणून विस्ताराने सांगतो)
मी दादरहून ठाण्याला चाललो होतो. दुपारची वेळ होती, रविवार होता. गाडि अश्यावेळी जशी रिकामी असते तशी रिकामी होती. एक कुटुंब माझ्या समोरच बसलं होतं. त्यातले वडिल, ही गाडी आपल्याच सृपेने चालत असल्या सारखे समोरच्या बाकड्यावर पाय पसरून झोपले होते. मातोश्री आनि त्यांची दोन मुले (खरतर कारटी म्हणणार होतो  ) उगाचच बडबड आरडाओरड करत होती. पुढे सायनला एक संत्री-मोसंबीवाला चढला, मातोश्रींनी मुलांसाठी संत्री घेतली. आणि ती मुलांसाठी संत्री सोलू लागली. प्रथेप्रमाणे सालं ही गाडिच्या डब्यातच टाकायची वस्तू आहे असा या बाईंचा ठाम समज असावा. त्याप्रमाणे त्यांनी एका संत्र्यांची सालं गाडितच खाली टाकली. आता बाईसाहेबांनी दुसरं संत्र सोलायला सुरवात केलीइ. त्याबाईची वटवट आणि एकूणच स्वभाव पहाता (आणि तिच्या नवऱ्याच्या साईझ्कडे बघुन  )तिला काही बोलण्यात अर्थ आहे असं वाटत नव्हतं.

म्हणून मग न रहावून मी उठलो आणि स्वतःच त्यांनी फेकलेली सालं गोळा करू लागलो. सगळा डबा माझ्याकडे बघत होता. मग एकदाची त्या बाईला लाज वाटली आणि एका पिराला धपाटा घालून "बघतोयस काय? जा सालं उचलं.. " असं म्हणून त्या मुलाला कामाला लावलं आअणि माझ्याकडे "आलाय मोठा शहाणा" अशा अर्थाचा कटाक्ष टाकला.
पुढे काहि नाही.. त्या बाईने तिसरं संत्र सोललच नाही. ते नवरा झोपला होता म्हणून की लाज वाटली म्हणून कोण जाणे..