...क क कवितेचा...
तुमची कविता खूपच छान आहे. सासरी निघालेल्या नववधूची मनःस्थिती तुम्ही फारच बारकाईने रेखाटली आहे. तिच्या मनात एकाचवेळी आई आहे, माहेर आहे, प्रियकर आहे, त्याला भेटण्याची ओढ आहे...आणि हे सारे तुम्ही फारच छान उतरवले आहे. (पण कवितेपूर्वी प्रस्तावना दिली नसतीत तरी चालले असते. एवढ्या बोलक्या कवितेला प्रस्तावनेची गरज काय...? )

काही ओळी तर खासच. त्या कोणत्या, तर या -

कळते आम्हा तव नयनांची  भिरभिरणारी भाषा...
बघ,आईच्या गावा कितीही सरी बरसुनी गेल्या...    
नीज म्हणू की जाग कळेना; धुकेच अवतीभवती!
मीठ सांडले; पीठ सांडले; कसे सावरू सारे? !!
डोळ्यातूनच हसायचे मग मिठीत शिरता शिरता !!
भेटी आपल्या स्मरुनि तेव्हा फ़ुलतील आत पिसारे !!
उगा एकदा साद घालशील... 'कुशीत घे ना आई'...!!
........
तुमची ही कविता वाचली आणि मला एकाच वेळी ही सारी गाणी आठवली...

शुभेच्छा.