विचारप्रदर्शनाकरता अधिकाधिक 'सुसंस्कृत आणि परिपक्व' भाषा वापरण्याच्या नादात कधीकधी मूळ मुद्दा राहतो बाजूला, आणि वाक्ये इतकी जड आणि शब्दबंबाळ होतात की त्यांचा अर्थ लावण्याऐवजी अनेकजण तो मुद्दा सोडूनच देतात. आता यात तोटा होतो कोणाचा ? तर तो मुद्दा मांडणार्याचा, कारण त्याचे म्हणणे फार कमी लोकांपर्यंत पोचते.
आपला विचार जास्तीत जास्त काटेकोर शब्दात मांडणे हा विचारप्रदर्शनाचा आत्मा आहे, आपले शब्दवैभव दाखवणे हा नाही, असे मला वाटते. एकदा ते जमू लागले, की मग शक्य तेथे आपल्या लिखाणातील इतरांना अकारण दुखावणारे शब्द बदलणे हा पुढचा टप्पा.
भाषेचे सौंदर्य दाखवण्याकरता संस्कृतप्रचुर रचना जरुर करावी, पण त्याच वेळी, काही अगदी मोजके लोकच त्या लिखाणाचा आनंद घेउ शकतील हेदेखील ध्यानात ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते.