तुमची सोयरा मला माझ्या 'चिमू' ची आठवण करून देते. माझी चिमू ही अशीच पांढरी लॅब आहे. तिचे लहानपण आठवले मला. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. तिच्या सवयी आणि सोयराच्या सवयी.... बहुतेक सगळ्या लॅबच्या सवयी एकसारख्याच असतात. जसे अंघोळ झाल्यावर होणारा अत्यानंदी नाच.....
माझी चिमू आता ७ वर्षांची झाली आहे. पण तिचा देखणेपणा अभिजात आहे. एकदा आई होण्याचे भाग्य तिला दिले आम्ही. मुख्य म्हणजे.... तिचे बाळंतपण केले तेव्हा ती तिला पहायला नियमित येणाऱ्या डॉक्टरांवर भुंकत असे.. पण अम्हाला घरच्यांना तिने कधी साधा दातही नाही लावला.
मी इथे परदेशात आणि चिमू आईकडे कोल्हापूरला. कधी फोन चालू असताना चिमूच्या भुंकण्याचा जरी आवाज आला तरी जीव हळवा होतो माझा...
तुमच्या सोयराच्या फोटोंमधून मला माझी चिमू दिसते.
सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.
- प्राजु.