हॅम्लेट,
मन:पूर्वक आभार. मी तो दुवा वाचला. छान माहिती मिळाली. त्या दुव्यामधे नमूद न केलेली काही ठिकाण (कारण खवय्यै लोक नवनवीन ठिकाण धुंडाळत असतात ) :
इथे चांगले पदार्थ मिळतात. चहाचे तर विविध प्रकार उपलब्ध आहेत.
पंजाबी डिशेससाठी प्रसिद्ध.
इथला वडापाव आणि मूग भजी केवळ अप्रतिम. वेळ: फक्त संध्याकाळी.
मला असं वाटतं की, जोशी वडेवाल्यांचा वडा आता तितकासा चांगला राहिलेला नाही. तसेच अप्पाच्या खिचडीमधे दाण्याचा कूट खूप जास्त असतो आणि साबुदाणे कमी असतात (चार आण्याची कोंबडी आणि आठ आण्याचा मसाला ). त्यापेक्षा बिपीनला जरूर भेट द्या.