"दिव्यांग" त्रैमासिकाच्या संपादिकांनी हरिपाठावरील लिखाण प्रकाशित करण्याची इच्छा माझ्याकडे व्यक्त केली होती. ते लिखाण आधीच मनोगतसाठी लिहिले असल्याने प्रशासकांची परवानगी घेणे उचित असे समजून मी त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी परवानगी दिलीच; पण सोबत जमल्यास मनोगतचा संदर्भ दिला तर बरे अशी अपेक्षाही कथन केली.

योगायोगाने संपादिकांनी त्या अटी मान्य केल्या आणि लेखन प्रकाशित केले. प्रशासकांच्या अपेक्षेनुसार झाले हे फक्त त्यांना सांगण्यासाठी मी विरोप पाठवला होता. त्यांनी येथे जाहिर केले.

गम्मत म्हणजे येथे जाहिर केल्याचे मला एका माजी मनोगतीकडून कळले.  याहू निरोपकावर अभिनंदन असा निरोप आला होता तिचा. तिच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता तिने हि माहिती दिली. तू मनोगत सोडलेस ना? असे विचारता तिने मला सांगितले की वाचक म्हणून येते की! फक्त लिहित नाही. म्हणजे "मनोगत" सोडले तरी मनातून जात नाही हेच खरे. मनोगतची हिच खरी देण आहे. खूप छान मित्रपरिवार लाभला येथे येऊन.

तसे मनोगत हेही एक माध्यमच आहे विचार देवाणघेवाणांचे. मग वेगळे " माध्यमिक मनोगती" का असे मला नेहमी वाटते.

प्रेमाने दखल घेऊन कौतुक केल्याबद्दल आभार.

(काही भाग संपादित : प्रशासक)