बकुळ,

एकदम झकास लिहिलंयत. माझे सगळे रात्री उशिरा थांबावे लागण्याचे अनुभव सर्रकन् आठवणीचे दार ठोठावून गेले.

ती भानावर आली तेव्हा वसंतराव गात होते..."कुणी जाल का...सांगाल का...". - हा तर एकदम रामबाणच !

टॅक्सीने घरी की हापिसात यामध्ये होणारे तळ्यातमळ्यात एकदम मस्त टिपले आहे. माझ्याबाबतीत निवड उलट व्हायची कारण जवळपास सर्व टॅक्सीवाल्या काका/आजोबांना आणि हापिसाच्या सिकुरिटीवाल्यालाही माझ्या रूमवर सुखरूप पोहोचण्याची माझ्याहून जास्त चिंता असायची/असतेही ! तब्ब्येत बरी नसतानादेखील जी काळजी टॅक्सीवाल्यांनी घेतली तिला तोड नाही. त्यांची भीती वाटण्याची कधी गरज पडली नाही कारण लहानपणापासून टॅक्सीवाले/रिक्षावाले असेच लोक माझे दोस्त आहेत किंवा माझ्या दोस्तांचे वडील आहेत. त्यांचे प्रश्न, आनंद ऐकण्यात २ तासाचा प्रवास भुर्रकन होऊन जायचा. त्यांचे विश्व एकदम निराळे असते आणि त्यातून त्यांच्या अनुभवकथनामार्फत चक्कर मारून यायला धमाल मजा येते.. आणि उदंड शिकायला मिळते ते वेगळेच.

माझ्या आक्काची एक मैत्रिण होती बकुळ नावाची. कधी तिला प्रत्यक्षात भेटण्याचा योग आला नाही पण आक्काच्या बोलण्यातून तिच्याबद्दल जे काही ऐकलं होतं त्यातून ती मला खूप आवडायची. हा लेख लिहिणारीही व्यक्ती 'बकुळ' नावच घेतलेली आहे यामुळे त्याही आठवणी विनाकारणच परत ताज्यातवान्या झाल्या. 'नावात काय आहे?' या प्रश्नाचं कुंचुमसं उत्तरच तर मला गवसलं नाही ना?