जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील पिंपरीतील विशाल थिएटरजवळचे हॉटेल रॉक्सी हे इराणी हॉटेल. चिकन मोगलाई खावी तर इथेच.
शिवाय मासुळकर कॉलनीतील हॉटेल छाया येथे मांसाहारी पदार्थ व पराठे मस्त मिळतात.
आकुर्डीतील खंडोबाच्या माळाच्या जरा अलीकडे नैवेद्यम महाराष्ट्रीय खाणावळ आहे. तिथे मराठी शाकाहारी थाळी अप्रतिम मिळते.
निगडीतील भक्ती-शक्ती चौकाच्या पुढे पूना गेट आणि गोल्डन पाम्स ह्या जोडगोळीमध्येही बरे मिळते.