अलिकडेच झालेल्या एक चर्चेत विनम्र व चित्त ह्यांनीही काही ठिकाणे सुचवली होती. ती इथे लिहीत आहे, जरूर पडेल तेव्ह शोध करणे सोपे जावे म्हणून.

विनम्र:

'कैंपातली एम जी रोडची चक्कर, वैशालीतली शेव बटाटा दही पुरी ,सुजाता मधली मस्तानी काय ,लक्ष्मीरोड वरची खरेदी, हनुमान टेकडी वरचे फ़िरणे, युनिव्हर्सिटी मधे रेंगाळणे, पर्वतीवर धापा टाकत मागे पुण्याकडे वळून बघणे या सर्व गोष्टींची मजा काही औरच !!!'

चित्त:

'पुण्यात अशा अनेक खानावळी आहेत. डोळ्यांसमोर लगेच आलेली काहीच नावे--
१. बादशाही  (टिळक रस्ता)
२. पुणे बोर्डिंग हाउस (पेरूगेट पोलिस चौकीसमोर)
३. जनसेवा (डेक्कन)
४. श्रेयस (आपटे रस्ता)
५. अभिरुची - भिडे बाग (सिंहगड रस्ता)'