लिखाण आधीच मनोगतसाठी लिहिले असल्याने प्रशासकांची परवानगी घेणे उचित असे समजून मी त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी परवानगी दिलीच; पण सोबत जमल्यास मनोगतचा संदर्भ दिला तर बरे अशी अपेक्षाही कथन केली.

मनोगतावरचे सदस्यांचे लिखाण हे त्यांचे आहे. त्यास ते कुठेही प्रकाशित करू शकतात. त्यासाठी प्रशासनाच्या अनुमतीची आवश्यकता नाही. मनोगताचा संदर्भ देणे न देणे हे त्या त्या सदस्याच्या आणि त्या त्या प्रकाशनाच्या ध्येयधोरणाप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे करावे. मनोगताचा संदर्भ देण्याने मनोगतींना आनंद होईल असे प्रशासनातर्फे सांगितले जाते, त्याचा अर्थ ती अट आहे असा नव्हे.