सोयराचं "हे" करण्याचा निर्णय मुक्ताला पटणारच नाही. तिच्या मनाविरुद्धच असणार आहे तो. सोयराला मातृत्वाची संधी देणं ठीक आहे हो, पण पेपरात जाहिरात देऊन तिच्या आठ-दहा पिलांना कोणातरी अनोळखी लोकांना "विकण्याबद्दल" काय म्हणायचं मग? मुक्ताच्या मैत्रिणी लाख पिलं घेवोत, पण त्यांचे आईबाप थोडेच पिलांना घरात घेणाराहेत :)? सोपं नाहीच.

प्राजु, तुमच्या भावना आमच्या कुटुंबातले सगळेच आता समजू शकतील. भुंकण्याचा आवाज एकणं राहिलं दूर, तुमचा प्रतिसाद वाचूनच जीव हळवा झाला माझाही.

बाकी सोयराच्या शरीरधर्माबद्दल म्हणाल, तर त्याची अगदी चांगली सवय झाली आहे आम्हाला. काही विशेष वाटत नाही. तरी बरं, आमच्या बाल्कनीत दिवसातून दोनदा होणाऱ्या तिच्या मुख्य शरीरधर्माबद्दल मी काहीच लिहिलं नाही.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

- कोंबडी