मान्य  .. पण असं मान्य वगैरेपेक्षा १ ते ५ च्या आलेखावर/चांदण्यांवर आपलं मत नोंदवलं तर? आणि हे प्रत्येस परीक्षणालाच नाहि तर लेख, कविता सगळ्यांनाच करता येईल .. कित्येकदा कसं होतं, लिहिलेलं आवडतं पण प्रत्येक साहित्याला प्रतिसाद दिला जातोच असं नाहि. अशावेळी कोणताही लेख वाचून झाला की या चांदण्या (१ ते ५ गुणांकनाच्या चांदण्या) दिल्या की झालं. जर साहित्य फ़ार आवडलं / नाहि आवडलं / काही प्रतिक्रिया असतील तर प्रतिसाद तर तुम्ही कधीहि देऊच शकता (हे गुणांकन प्रतिसादाचा विकल्प म्हणून नाही तर प्रतिसादाच्या सोबतीने काम करेल)

प्रशासक,
अशी गुणांकन सुविधा तुमच्यातर्फ़ेच देता येणं शक्य आहे का?