केशवा,
हा प्रतिसाद वाचून तू रागावलास तरी चालेल! पण हे विडंबन,ही बाटली,ह्या उपमा तुझ्याच कुठल्यातरी जुन्या विडंबनाची पुनरावृत्ती वाटतात. विडंबन, त्यातही 'पालकहिंसा' व 'मदिरापान' ह्या कुंपणातच तुझी प्रतिभा अडकल्यासारखी वाटते.तुझे काव्य 'एकदिशा काव्य' झाले आहे!
सागर पोहून जाण्याची क्षमता असणाऱ्या निष्णात पोहणाऱ्याने पोहण्याच्या तलावातच डुंबत रहावे याचे वैषम्य वाटते.तुझे स्वत:चे,वरील विषयांपेक्षा वेगळे विषय असणारे काव्य कधी वाचायला मिळणार?असो.
तरीही तुझा चाहता,
जयन्ता५२