कोणतीही सेवा रात्रीसुद्धा चालू असायची खरच गरज आहे? आता असं बघा, एखादी केस कोर्टात चालू आहे. वेळ रात्री अडिच, तुमच्या पैकी किती जणांना रात्री अडिचला कोर्टात जायची शक्ती / स्थिती असेल? तुम्ही पहाटे साडेचारला उठून पोलीस स्टेशनवर पारपत्रासाठी सही करायला जाल का? जर पोस्टमन रात्रि दिडला पत्र घेऊन आला / घरासमोरचा रस्ता कामगारांनी पावणेतीन ला मोठ्ठा आवाज करत खणायला घेतला तर किती जणांची हरकत असेल.

काम झालं पाहिजे हे ठिक आहे. पण अहोरात्र कष्ट करून काम उपसण्याची खरच गरज आहे का? माझ्यामते शासकीय सेवा १६ तास चालू असाव्यात. हे सगळ्याच्या सोयीचं आणि काम संपण्याचा दृष्टीने गरजेचं आहे.