आपल्या पाठिंब्याबद्दल आभार! आजुन एक चांगली सवय, जी आम्ही स्वतः अंगिकारली आहे..
लांबच्या प्रवासाला निघताना मग ते स्वतःच्या गाडिने असो वा ट्रेन, बस कसेहि.. आम्ही घरुन निघतानाच एक प्लस्टिकची पिशवी सोबत घेतो. प्रवासात फळे, गोळ्या, बिस्किटे काहिही खाल्ले तर साली, वेष्टणे, वगैरे कचरा त्या पिशवीत गोळा करुन जिथे कचरा पेटी मिळेल तिथे तो कचरा टाकतो. आमच्या घरातिल, जवळच्या नात्यातिल सर्वांनाच आता ही सवय लागली आहे. या सवयी लागणे फार सोपे आहे, फक्त ईच्छा हवी!
दुसरा प्रकार म्हणजे, मी जर दुचाकीने जात असेन आणि माझ्या पुढे एखाद्या कार मधुन टिश्यु पेपर, मॅक डोलंड चे रिकामे कप वगैरे काही खाली टाकताना दिसले, तर मी त्यांचा पाठलाग करुन, सिग्नल जवळ वगैरे गाठुन त्यांच्या गाडीच्या काचेवर टक टक करुन त्यांना काच खाली करायला लावुन सांगतो "आप का कुछ सामान गिर गया है!" कधी कधी ते लोक खजील होउन "सॉरी" म्हणतातही, काही वेळा आगावुपणा करुन "तुम्हारे बाप का रस्ता है क्या? साला हमको सिखाता है!" वगैरे सुद्धा बडबडतात. एकदा तर खाली उतरुन हमरी तुमरीवर सुद्धा आला होता एक महाभाग! पण मीच लोकांच्या मदतिने त्याची चंपी केली आणि त्याला तो कचरा उचलुन गाडीत घ्यायला लावला! मग त्याची बायको रडवेली होउन बघत राहिली. मी तिला म्हटले "बेहेनजी, आप बुरा मत मानिये, अगली बार ऐसा नही होगा, भाईसाहब सुधर जाएंगे!". मग तो माणुस जरा पुटपुटत गाडीच्या काचा वर करुन निघाला आणि चक्क पब्लिकने टाळ्या शिट्या वाजवुन माझे अभिनंदन केले! मला जरा हिरो झाल्यासारखे वाटले, पण नंतर मी असे धाडस कधी केले नाही कारण आता चाळिशी उलटली.. मारामारीची वेळ आली तर पळायला तरी जमले पाहिजे ना!
पण माझी एकच ईच्छा आहे, या सवयींची लागण सर्वत्र लवकरात लवकर व्हावी!