कथेचा शेवट आणि सुधाबाईंचे स्वगत फिल्मी वाटले. बाकी कथारचना आणि निरीक्षणे अप्रतिम.झोपेत चुळबुळणाऱ्या बाळाच्या अंगावरून हळूहळू दुपटे सरकत जावे तसे ,जिचा चेहरा बघताच हिने हातात चहाचे गाळणेदेखील धरले नसेल याची खात्री पटे,नेहमीच्या 'छोटी गोल्ड्फ्लेक' ऐवजी 'विल्स नेव्हीकट' ला सुरुवात ,शेवटचा उकार खाण्यासाठीच असतो अशी तिची ठाम समजूत,वत्सलाबाई मन लावून टिपे गाळत होत्या असे बरेच काही आवडले.