कचरा वा निरुपयोगी वस्तु कुठेही टाकण्याची मानसिकता भारतीय समाजात पूर्वीपासून आहे. कुठल्याही हिंदी सिनेमात पहा. कोणालाही पत्र आले की ते उघडून संबंधित पात्रे (नायक, नायिकाही) पाकिट खालीच टाकून पत्र वाचायला सुरवात करतात. अगदी लहान असतानाही असली दृश्ये पहाताना मी अस्वस्थ होत असे. हल्लीच्याच मोटरसायकलच्या जाहिरातीत पहा. देशप्रेमाचे प्रदर्शन करताना हिरो परदेशातल्या नोकरीचे पत्र फाडून टाकतो आणि भर रस्त्यात उधळून देतो. रस्त्यात कचरा करणारा तो कसली देशसेवा करणार ?