आपण हे जे सर्व निष्ठेने करताहात, ते खरोखरच कौस्तुकास्पद आहे. ज्या जागेत मानवाच्या आयुष्यालाच कसली किंमत उरलेली नाही, तिथे हे सर्व लोकांच्या गळी उतरविणे किती कठीण आहे, ह्याची उदाहरणे आपल्या लेखात, ह्या प्रातिसादात व ऋषिकेश ह्यांच्या प्रतिसादात दिसून येतात. मात्र हमरीतुमरीवर आलेल्या प्रसंगाबद्दल सावधान. अनेल लोक अशा प्रसंगांना बघे असतात, पण जेव्हा प्रत्यक्ष काही करण्याची वेळ येते, तेव्हा पाठी पळतात. ह्या एका प्रसंगात लोक आले खरे, पण पुढल्या वेळी तसे होईलच असे नाही.