साधा, सोपा विषय...(प्रत्येकाच्या मनातला !). तितक्याच साध्या-सोप्या पद्धतीने मांडलेला. छान कविता.
ही कविता वाचून मला एक जुने, अतिशय छान गाणे आठवले. कविवर्य स. अ. शुक्ल यांचे. (गायिका - आशा भोसले )
विसरशील खास मला दृष्टिआड होता
वचने ही गोड गोड देशि जरी आता...
आणखी असेच एक सुंदर गाणे आहे. आशा भोसले यांनीच गाइलेले. कवी आहेत गंगाधर महांबरे.
ते गाणे असे -
तू विसरुनि जा रे, विसरुनि जा...
तुझ्या जीवनी चुकुनि आले, चुकले होते वाट..
अर्थात ही दोन्ही गाणी स्त्री-भूमिकेतून लिहिलेली आहेत, तर येथे, ती आपल्याला विसरून जाईल की काय, अशी शंका त्याला (पक्षी ः कवीला) सतावत आहे...!
..........
नचि९०२१०.
शुभेच्छा,
म्हणजे कवितालेखनासाठी शुभेच्छा...आणि तिने तुम्हाला विसरू नये, ही सदिच्छा !
..........