पाकशास्त्रावर अशाप्रकारची पुस्तके मराठीतही येताहेत, ही चांगली गोष्ट आहे. अर्थात पाककला आणि पाकशास्त्र ह्या शब्दांचा अर्थ तसा स्पष्टच आहे. म्हणजे हे इंग्रजीत म्हणतात तसे एक्ज़ियमॅटिक आहेत. म्हणजे वेगळी व्याख्या द्यावी लागू नये. होटल मॅनजमंटच्या विद्यार्थ्यांना अशी पुस्तके अभ्यासक्रमात असतात. माझ्या एका शेफ मित्राकडून अशी पुस्तके वाचल्यावर साध्या साध्या पाककृती करताना बरीच मजा आली होती. पाटा वरवंटा वापरून केलेल्या चटण्या, वाटणं ह्यांची तुलना दमास्कसच्या पोलादाशी कराविशी वाटली. पाट्या वरवंट्यातही ह्यातही बहुधा नॅनोटेक्नॉलजीचा वापर होत असावा ;)