विज्ञान आहे याच्याशी सहमत आहे. पण हे विज्ञान अंगभूत असते असे मला म्हणायचे होते. म्हणूनच आया-मावशांच्या हातची कुठलीही मोजमापे न घेता बनवलेली पाककृती पुस्तकातल्या १५० ग्रॅ. तुरीची डाळ आणि अर्धा इंच आले या थाटाच्या पाककृतींपेक्षा रुचकर होते.   तरीही स्वैपाकात अमुक गोष्ट का होते त्यामागचे कारण जाणून घेणे नक्कीच उपयोगी आहे.
बाकी या सर्व प्रकाराला शास्त्र म्हणतात की कला याबद्दल जराही फिकीर न करता एखादी गृहीणी इतका झक्क स्वैपाक करते की त्यापुढे आपले पुस्तकी ज्ञान व्यर्थ आहे असे वाटायला लागते ;)
हॅम्लेट