वर केलेल्या विधानावरून अर्थ स्पष्ट झालेला नाही. लीस्ट काउंट म्हणजे मोजमाप करायच्या साधनाचा वापर करून मोजता-तोलता येण्यासारखे लहानात लहान माप किवा वजन. याउलट, पासंग म्हणजे तराजूची दोन्ही पारडी रिकामी असताना जर असमतोल असतील,  तर ती समतोल करण्यासाठी तराजूच्या कडीला अडकवण्यात येणारे लहानसे वजन.  याला झीरो एरर म्हणता येईल, लीस्ट काउंट नव्हे.  

पासंग म्हणजे अभंड नाही.  अभंड म्हणजे तराजूच्या एका पारड्यात माल भरण्यासाठी ठेवलेल्या रिकाम्या भांड्याच्या वजनाइतके,  दुसऱ्या पारड्यात ठेवलेले वजन किंवा वस्तूवजा वजन.  म्हणजे भांड्याचे अभाण्ड करण्याचे कार्य करणारे वजन;  हे पासंगाप्रमाणे किरकोळ नसते.

पासंग शब्द पसंगा या फारसी शब्दावरून आला.  हिंदीत पसंगा हाच शब्द आहे. मूळ फारसीतला अर्थ 'अल्प'.