ते पुस्तक खरंच अप्रतिम आहे. माहितीचा खजिना आहे. ज्यांना स्वयंपाक आवडतो, ज्या स्वयंपाकघरात रमतात अशांसाठी तर उपयुक्त आहेच. पण ज्यांना त्यात फ़ारसा रस नाही त्यांनाही त्यातली शास्त्रीय बाजू समजली तर आवड निर्माण होऊ शकेल. स्वतः घरात ठेवावं आणि वाढदिवसाला भेट द्यावं असं पुस्तक आहे. त्यामुळे उद्याच जाऊन त्याच्या १० प्रती आणून ठेवायला हरकत नाही.