सुशिक्षित असणे आणि विज्ञाननिष्ठ असणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. तसेच विज्ञाननिष्ठ असणे म्हणजे नास्तिक असणे असेही नव्हे. पण देवाचे वा त्या कर्त्याकरवित्याचे आस्तित्व मान्य करुन देखील जो फक्त स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास ठेवून वागतो तोच खरा विज्ञाननिष्ठ! बाकी पूर्वज करत होते म्हणून मी चालू ठेवले आहे असे म्हणणे म्हणजे पळवाट झाली. अनवाणी पायांनी सिद्धिविनायकाला चालत जाणारे अनेक सुशिक्षित अंधश्रद्ध मी पहातो आहे. असेच लोक असल्या मेल पुढे पाठवत असतात.