ही कविता माडगूळकरांची असली तरी कल्पना माडगूळकरांची नाही. ही परीकथा एच. सी. अँडरसन यांची. परीकथा या मुलांना त्यातून काहीतरी बोध घ्यावा म्हणून सांगितल्या जातात. जसे या कथेत, इतरांनी कुरुप म्हटले (किंवा नालायक ठरवले) म्हणून ती व्यक्ती कुरुप असेल (नालायक असेल) असे नाही. तिचे मन सुरेख असू शकते आणि पुढे जाऊन ती इतरांना सुंदर भासू शकते (लायक ठरू शकते.) तेव्हा कथेकडे फार वास्तववादी दृष्टीकोनातून पाहण्यात फारसा अर्थ वाटत नाही.
शोभना समर्थ आपल्या मुलीला नूतनला अग्ली डकलिंग समजत असे वाचल्याचे आठवते. चू. भू. दे. घे.
राजहंस हा पक्षी असतो आणि त्याची पिले बदकांच्या पिलांपेक्षा वेगळी दिसतात आणि तो बदकापेक्षा खचितच डौलदार असतो.