राजहंस कुरूप किंवा वेडा कसा असू शकतो ? ही गोष्टच आशी आहे की पिल्लु आधी कुरूप असते, पण कालांतराने त्याचे खरे रूप समजते. येथे कुरूप म्हणजे वाईट या अर्थाने न घेता "इतरांपेक्षा" वेगळे या अर्थाने आले आहे. तसंही कुरूप हे फ़ारच सापेक्ष विषेशण आहे.
आणि वेडं म्हणजे, "अगदी वेडू आहे माझं बाळ!!" या एखाद्या मातेच्या उद्गारातील 'वेड" आहे. मुर्ख याअर्थीचा तो वेडा नाही. तर कौतूकमिश्रित काळजीतून आलेलं वेडं पिल्लु ते आहे.
आणि राजहंस असतो. तो मोत्याचा चारा खातो वगैरे खोटं आहे (संदर्भ: मारूती चित्तमपल्ली). तोही छोटे मासे, किडे खातो. पण रात्री तो पानांवर पडणारे दव शोषून घेतो म्हणून तो चांदण पितो असं म्हणतात (रात्री चांदण्यांमुळे दव चमकतं)