सर्व रसिक वाचकांना धन्यवाद देतो. नरमगरम, आनंद, अंगूर, अनुपमा यांच्या रसग्रहणाविषयी रसिकांनी लिहिले आहे. माझ्या बाबतीत तर घडते ते असे: चित्रपटातले एखादे गाणे, एखादा सीन मनात बरेच दिवस घोळत रहातो. मग त्या निमित्ताने सगळा चित्रपट आठवतो आणि मग रसग्रहण लिहावेसे वाटते. यातले ठरवून, बेतून असे फारसे होत नाही. वर उल्लेख केलेले चित्रपट श्रेष्ठ आहेत, हे खरेच, पण त्यांवर लिहावे असे आता तरी आतून वाटत नाही. 'आनंद', 'अंगूर' यांवर इतके लिहून झाले आहे, की नवीन काय लिहिणार?
मीराताई,
'मधुशाला' बाबत सहमत आहे. प्रश्न अमिताभच्या निवेदनाचा नाही, पण मूळ चित्रपट इतका गुणी आहे, की त्या निवेदनाने त्यात काही फारशी 'व्हॅल्यू ऍडिशन' होत नाही, इतकेच मला म्हणायचे आहे.
डेव्हिड धवनचा हिरो नं.१ हा बावर्ची वर आधारित आहे.
हे मला माहिती होते, पण हृषिकेश मुखर्जी, गुलजार, मदनमोहन यांच्यावरील लेखात डेव्हिड धवन, हीरो नं.१, गोविंदा असे उल्लेख मला करावेसे वाटले नाहीत!
सन्जोप राव