आपले दोन्ही उद्देश योग्य आहेत.
आपण म्हणता तसेच पुस्तक परीक्षण निरपेक्षपणे करावे पण एखादे पुस्तक वाचतांना निरपेक्षता राहणे आम्हाला अवघड वाटते.(स्वतःला तसे करणे अजूनही जमलेले नाही) कोणत्याही विषयावर तटस्थ राहून लेखन एकदम जमणारे नाही. जे आवडले/ नावडले त्यावर अधिकाधिक ठळकपणे भाष्य करतांना व्यक्तीगत आवड त्याआड येणार नाही याचा मोह आवरणे अशक्य वाटते. भाषा, शैली, मांडणी यासर्वांचे परीक्षण करतांना लेखक , विषय याविषयी तटस्थता राखता आली पाहिजे. ती राखण्यासाठी काय प्रयत्न करावेत यावर मार्गदर्शन करायला हरकत नाही.
एकमेकांच्या परीक्षणातील उथळपणा शोधण्यासाठी परीक्षणे नसावी तर दोन मते म्हणून ती असावीत. ह्यासाठी पूर्वनियोजित पावले उचलायला हवीत. वाचकांना ती परीक्षणे साधारण एकाच कालावधीत वाचता आली तर फायदेशीर ठरतील. पुस्तकाचे परीक्षण करतांना मासिकातील, दैनिकातील अथवा अशाच प्रकारच्या स्त्रोताचा संदर्भ देता आला तर उत्तम.
परीक्षण म्हणजे काय?काय त्याचा उद्देश काय? हे स्पष्ट असेल आणि वाचक निरपेक्षपणे परीक्षण वाचणार असतील तर कष्ट घेऊन परीक्षणाचे सार्थक होईल.( त्यामुळे कोणाचा वेळ, बाजाराच्या /वाचनालयाच्या फेऱ्या आणि दमड्या वाचल्या तर अधिकच यशस्वी) .
मनोगतींची मते आणि त्याचा अहवाल तयार करण्याची कल्पना आवडली. त्याने सुसूत्रता येईल. हा विषय मनोगतावर चर्चेसाठी आणला त्याबद्दल आभार.
अवांतर: बसलेले/ बसवलेले गणपती सगळीकडे असतात.