नेहमी तर मी  ते पत्र कचऱ्याच्या पेटीतच टाकतो आणि पाठवणाऱ्याला सांगतो की पुन्हा पाठवू नकोस. पण हे ही किती वेळा करणार?

मला एकदा असा मेल याहू ग्रूप वर आला होता. त्यातही असेच होते की हा मेल पुढे पाठवला तर चांगले होईल अन्यथा वाईट होईल. खूप रागात त्या मेल ला उत्तर दिले...
"मी अशा विपत्रांचा निषेध करतो. माझा ह्या गोष्टींवर विश्वास नाही. पण जर तुमचा असेल तर लक्षात ठेवा की माझ्यासोबत जे काही वाईट होईल त्याला तुम्ही जबाबदार असाल."

एक दोन वर्षांपुर्वी असाच ह्या बद्दल एक ई मेल आला होता... तो इथे  पाहता येईल.