ना कधी वाहिलो वाऱ्यासारखा, ना खळाळलो कधी झऱ्यासारखा
ना झालो गंधावणारे फ़ूल मी, ना कधी उफ़ाळणारे प्रेम मी
स्वप्नेच ही सगळी.. पण ती पाहणेही राहून गेले...
छान
............................
प्रौढपण वार्धक्याच्या काळजीत निघून गेले... आज कळले माझे जगायचेच राहून गेले...
या ओळी वाचून मला आठवले -
थोर कवी आणि गीतकार शैलेंद्र यांचे ते सुप्रसिद्ध गीत....
सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है...आणि त्यातील हे क़डवे -
लडकपन खेल मे खोया...
जवानी निंदभर सोया...
बुढापा देखकर रोया...
..................
कविवर्य सुधीर मोघे यांचेही असेच एक गाणे आहे....
दयाघना, का तुटले चिमणे घरटे....आणि त्यातील हे कडवे -
बालपण ऊतू गेले...
आणि तारूण्य नासले...
वार्धक्य साचले...