अप्रतिम निरीक्षणशक्ती, सूक्ष्म भावभावना टिपण्याची विलक्षण हातोटी, चपखल उपमा. नर्म विनोदामुळे रसभंग न होता उलट लेखनाचा एकसुरीपणा टळतो असे वाटते.
'लोखंडवालाच्या परिसरात राहून कवडीमोलाच्या लोकांच्या कोटीमोलाच्या गोष्टी आशाळभूतपणे ऐकणे', 'पण वेळेच्या कमतरतेवर त्याने आपल्या संवेदना तल्लख करून मात केली होती', 'मॅनेजर सुदीप आगाशेने पुणे विद्यापीठातून मास कम्युनिकेशनची पदविका घेतल्याने त्याला अर्थातच सगळे येत होत' असे बरेच आवडले.
शेवटचे स्वगत थोडे वेगळ्या प्रकारे आले असते तर जास्त परिणामकारक झाले असते असे वाटते.