वृत्त सारखे असले की चाली एकमेकांच्या एकमेकाला फिट्ट बसतात. (हा मुद्दा मनोगतावर हज्जारदा [मीच] मांडला आहे; एक हजार एकाव्या पुनरावृत्तीबद्दल क्षमस्व!)

शाळेत असताना मराठी पद्याच्या तोंडी परीक्षेला आम्ही शार्दूलविक्रीडितातली कोणतीही कविता - मग ती अगदी 'युद्धांचे भडकून घोर वणवे, राज्ये जळाली किती' असली तरी - परीक्षकांना मंगलाष्टकांच्या चालीवर ऐकवत असू. किंवा हिंदीच्या तोंडी परीक्षेला जवळपास कोणतीही कविता 'मेरा दिल ये पुकारे आजा'च्या चालीवर.

गृहपाठ: 'सदा सर्वदा योग तूझा घडावा' किंवा कोणताही मनाचा श्लोक हा 'अकेले अकेले कहाँ जा रहे हो'च्या चालीवर म्हणण्याची आयडिया जुनी झाली, तेव्हा आता हा नवीन प्रयोग करून पहा. 'कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या' हे गाणे 'मुहब्बत ऐसी धडकन है जो समझायी नहीं जाती'च्या चालीवर (किंवा व्हाइसे व्हर्सा) म्हणून पहा.