मन कधी तृप्त... अन कधी आसुसलेले
मन कधी शांत... अन कधी गहिवरलेले
मन भिरभिर होते... अन मागते काही
कधी होते कैकयी... कधी भिष्माची ग्वाही !
ह्या कातरवेळी... साजण घाली साद
त्या कळे कसे ना... देऊ कसा प्रतिसाद
तो दूर तिथे... परी मन रेंगाळून 'येथे'
मम श्वास... ध्यास... विश्वास मागुनी घेते !
छान....हे दोन्ही तुकडे खूप आवडले.
त्यातही
मन भिरभिर होते... अन मागते काही
कधी होते कैकयी... कधी भिष्माची ग्वाही !
....................
ह्या कातरवेळी... साजण घाली साद
त्या कळे कसे ना... देऊ कसा प्रतिसाद
या ओळी तर खासच...शुभेच्छा.