अ.. माझं मराठी काही एवढं चांगलं नाही आहे. जितकं बोलण्याचालण्यात शिकलो तेवढंच येतं. म्हणून बहुतेक मी वाक्यरचनेत आणि शुद्धलेखनात बर्‍याच चुका करत असीन. माझं मराठी जरासं सुधारण्याच्या उद्देशाने मी इथे येतो, लेख वाचतो आणि वाटल्यास आपलं मत मांडतो. हळूहळू वाचून वाचून माझं शुद्धलेखन सुधरेल. तोपर्यंत नाइलाज आहे बुवा. हं, तुम्हाला माझा एखादा लेख एकदमच अवाचनीय किंवा अडचणीचा वटला तर वाचण्याचे कष्ट करू नका, माझी काहीच हरकत नाही आहे :-).