सन्जोपराव,

रसग्रहण आवडले. घरातल्या सर्व आळशी लोकांना वठणीवर आणणारा रघू उर्फ राजेश खन्नाचा अभिनय व त्याचबरोबर त्या घरातील मुले सूना व घरातला कर्ता पुरूष यांचाही अभिनय दाद देण्यासारखा झाला आहे.  एकदा रघूची नजर चुकवून प्रेमळ दुर्गाबाई चटपटे चणे बनवून आपल्या धाकट्या जावेला (उषा किरण)  देताना "देख मैने तेरे लिए क्या बनाए है, चटपटे चने. देख ना, ये रघू! रसोईमें घूसनेही नहीं देता!" किंवा उषाकिरण दुर्गाबाईना "पॉंवमें बहुत दर्द होता है ना,मै बाम लगाती हुँ " या आणि अशा अनेक संवादातून, सर्वांशी गोड बोलून रघू ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगून जातो याची झलक दिसते.

रोहिणी