बाहेरून आलेल्यांनी दाखवल्याशिवाय तुम्हाला प्रेरणा मिळणार नाही असं म्हणायचय का? बाहेरून आलेले किंवा बाहेर गेलेले काय करतात या पेक्षा जे तिथे कायमचे आहेत ते काय करतात हे जास्त महत्त्वाचं असं मला वाटतं.
मला नाही वाटत लोकं बाहेरून आलेल्यांनी आदर्श घालून देण्यासाठी/प्रबोधनासाठी थांबली आहेत. आपल्याकडे बरेच आदर्श आहेत. प्रश्न आहे प्रत्यक्ष कृती करणारे नाहि आहेत

पण म्हणून नेहेमी नावचं ठेवण्यापेक्षा त्या पद्धतीने इथे वागून आदर्श घालून द्यावा.
कोणी नावं ठेवेल असं वागावंच का? त्यात एखाद्याने चूक दाखवून दिली तर त्यावर "स्वतः बघा आधी काय करताय ते!" असं म्हणण्यापेक्षा (खरंतर असं म्हणून जबाबदारी झटकण्यापेक्षा) , "ह्म्म चूक आहे खरी मी तरी ही परत करणार नाही
बाकीच्यांचं बाकीचे बघतील." असा सूर का नसावा?